Talegaon Dabhade : एकांकिका महोत्सवाच्या आयोजनाने कलापिनीचा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – कलापिनी कला मंडळ  2023-24 तर्फे जागतिक (Talegaon Dabhade) महिला दिनाच्या निमित्ताने कलापिनी महिला मंच निर्मित आणि कै. रजनी नागेश धोपावकर स्मृती आयोजित एकांकिका महोत्सव उत्साहात साजरा झाला.

यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी  ममता राठोड,  कै. रजनी नागेश धोपावकर ट्रस्टचे पदाधिकारी प्रशांत दिवेकर, कौस्तुभ ओक, सतीश साठे तर कलापिनी चे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्ष अंजली सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष अशोक बकरे, सचिव हेमंत झेंडे,  कला मंडळाचे प्रमुख चेतनभाई शहा आणि संजय मालकर उपस्थित होते.

कलापिनी महिला मंचच्या महिला  कलाकारांचा सहभाग असलेल्या अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई  व सांगड या दोन   एकांकिका यावेळी सादर  करण्यात आल्या.

Chinchwad : पोलीस आयुक्तांकडून वार्षिक तपासणीसह निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई मृणालिनी चितळे ह्याचे लेखन असून दिग्दर्शन केले होते अनघा बुरसे ह्यांनी , संगीत लीना परगी तर संगीत संयोजन जयश्री भालशंकर ह्यांनी केले होते. यात सहभागी महिला कलाकार होत्या केतकी लिमये, उमा भालेराव, लीना परगी, मुग्धा भालशंकर,मीनाक्षी झेंडे, राखी भालेराव, मधुवंती रानडे, वंदना चेरेकर, ऋचा पोंक्षे, किर्ती देसाई, रश्मी पांढरे आणि दीप्ती आठवले . नेपथ्य सुप्रिया खानोलकर आणि मधुवंती रानडे  यांनी केले होते.

तर  सांगडचे  लेखन मिलिंद खरात आणि प्रियंका हांडे ह्यांचे होते, दिग्दर्शन विजय कुलकर्णी तर नेपथ्य आणि संगीत होते सुमेध सोनवणे यांचे होते.  तर  माधुरी ढमाले कुलकर्णी, ज्योती गोखले, मीरा कोन्नुर , ज्योती ढमाले, केतकी लिमये, शुभांगी देशपांडे आणि दीपाली जोशी  हे कलाकार होते.

स्वागत कलापिनीचे  उपाध्यक्ष अशोक बकरे ह्यांनी केले. कलापिनीच्या कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुद्धे ह्यांनी प्रास्ताविक करताना. महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा,नवीन शिकण्याची संधी मिळावी यासाठी जास्तीत जास्त महिलांनी महिला मंच मध्ये सामील व्हावे असे आवाहन  केले.

ममता राठोड यांनी आपल्या भाषणात कलापिनी संस्था लहान मुलांना संस्कार देतेच पण सर्व वयोगटातील व्यक्तींना सुद्धा उत्तम कलाकार घडविण्याचे मोठे कार्य करते आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सर्व कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले.

रजनी धोपावकर ट्रस्टचे सतीश साठे ह्यांनी देखील सर्वांचे कौतुक करून दरवर्षी अशीच नवीन कलाकारांना संधी आणि नवीन एकांकिका ची निर्मिती असणाऱ्या उपक्रमांना धोपावकर ट्रस्ट नेहेमीच सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

रंगमंच सजावट सुप्रिया खानोलकर आणि महिला मंचच्या कलाकार यांनी केली होती. प्रतीक मेहता, चेतन पंडित आणि सहकारी यांनी प्रकाश योजना  सांभाळली.  सूत्र संचालन डॉ. मीनल कुलकर्णी यांनी केले.  ध्वनिसंयोजन सुमेर नंदेश्वर यांचे होते तर (Talegaon Dabhade) छायाचित्रण हितेश शिंदे यांचे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.