Chikhali : उच्चदाब विद्युत वाहिनीचा लहान मुलाला बसला शॉक

एमपीसी न्यूज – महावितरणच्या उच्चदाब विद्युत वाहिन्या अंडरग्राउंड (Chikhali) टाकण्याची मागणी करूनही विद्युत वाहिन्या अंडरग्राउंड न टाकल्याने उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 16 एप्रिल रोजी सायंकाळी रुपीनगर तळवडे येथे घडली. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अतुल महादेव बेळे (वय 41, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : सीमा रस्ते संघटनेची मुख्य अभियंता आणि उपकरणे व्यवस्थापन वार्षिक परिषद पुण्यात संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर परिसरातून महावितरणच्या उच्चदाब वाहिन्या गेल्या आहेत. त्याचा परिसरातील नागरिकांना धोका होण्याची दाट शक्यता असल्याने फिर्यादी बेळे आणि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या इतर लोकांनी महावितरणच्या कार्यालयात लेखी आणि तोंडी निवेदन दिले होते. त्यात नागरिकांनी उच्चदाब वाहिन्या अंडरग्राउंड टाकण्याबाबत मागणी केली होती. मात्र महावितरण कडून या मागणीवर गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.

16 एप्रिल रोजी फिर्यादी यांचा मुलगा पतंग खेळत असताना त्याचा पतंग उच्चदाब वाहिनीवर अडकला. तो पतंग फिर्यादी यांचा मुलगा जुन्या केबलच्या सहाय्याने पतंग काढत असताना त्याला शॉक बसून त्याच्या अंगावरील सर्व कपडे जळाले आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी निष्काळजी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.