Talegaon Dabhade : तळेगावचे मोदी, शहा म्हणजे बाळा भेगडे आणि गणेश भेगडे – सुशील सैंदाणे

बाळा भेगडे, गणेश भेगडे, जितेंद्र बोत्रे यांच्या नवीन निवडीबाबत तळेगाव भाजपकडून सत्कार

एमपीसी न्यूज – माजी राज्यमंत्री संजय (बाळा) विश्वनाथराव भेगडे (Talegaon Dabhade) यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी, भाजप पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्यपदी आणि भाजपचे युवा नेते जितेंद्र दत्तात्रय बोत्रे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजप तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने तिघांचा सत्कार करण्यात आला. तळेगाव दाभाडे येथील भाजप शहर कार्यालयात शनिवारी (दि. 6) सत्कार समारंभ संपन्न झाला. ज्येष्ठ नेते,माजी उपनगराध्यक्ष,पत्रकार सुशील सैंदाणे यांनी बाळा भेगडे आणि गणेश भेगडे यांची तळेगाव शहराचे मोदी आणि शहा अशी उपमा देत कौतुक केले.

या कार्यक्रमास भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक काळोखे,अनुसुचीत जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल कांबळे,सचिव सूर्यकांत गरुड,माजी गटनेते अरुण भेगडे पाटील, नगरसेविका शोभा भेगडे,संध्या भेगडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मल ओसवाल, कार्याध्यक्ष सागर शर्मा,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम,अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनिल कांबळे,महिला मोर्चा स्टेशन विभाग अध्यक्षा तनुजा भेगडे,उत्तर भारतीय आघाडी महिला अध्यक्षा पूर्णिमा उपाध्याय, शहर प्रभारी वैभवज कोतुळकर,शहर उपाध्यक्ष संजय दाभाडे, संजय जाधव, रुस्तुम नालबंद,यतिष गोरे, विलास गायकवाड,

Talegaon Dabhade : तळेगावचे मोदी, शहा म्हणजे बाळा भेगडे आणि गणेश भेगडे – सुशील सैंदाणे

प्रज्ञा आघाडी अध्यक्ष पद्मनाभ पुराणिक,दिलीप सुतार,विजय पंडीत,गणेश वेदपाठक, सचिव गणेश देवरे, कामगार आघाडी सरचिटणीस आतिश रावळे, उपाध्यक्ष अनिल शेलार,ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अमित भागिवंत,भाजयुमो सरचिटणीस अवधूत टोंगळे,महावीर शेटे,महिला मोर्चा प्रसिध्दी प्रमुख श्रीमती मृदुलाताई भावे,विनोद उपाध्याय,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सचिव श्रीकांत वालावलकर, कामगार नेते दिपक भेगडे,कामगार आघाडीचे संजय पवार,सतिष पारगे, वंदना काळोखे,मोहन थिटे आणि  आरपीआय पदाधिकारी उपस्थित होते.

सैंदाणे पुढे बोलताना म्हणाले की, तळेगाव शहरातील मोदी आणि शहा अशी जोडी म्हणजे माजी मंत्री बाळा भेगडे व पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे असे त्यांना संबोधले असे सांगत संयमाने बोलणारे बाळा भेगडे आणि आक्रमक गणेश भेगडे यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. माजी मंत्री बाळा भेगडे हे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत आहेत तर जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी जेष्ठ नेते मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आपले स्थान पक्के केले आहे अशी वैशिष्ट्ये सांगत प्रदेश भारतीय जनता पक्षाने या दोन्ही नेत्यांचा व मावळ तालुक्याचा पदभार देऊन सन्मानच केला आहे भविष्यकाळात या दोन नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली राजकीय यश निश्चित मिळेल असे सांगत सर्वांच्या वतीने सुशील सैंदाणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

सत्कार मूर्तींना शुभेच्छा ज्येष्ठ नेते सुरेश झेंड, माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,माजी नगरसेवक श्रीराम कुबेर,RPI तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष संदिप शिंदे, ज्येष्ठ नेत्या, सरचिटणीस श्रीमती रजनी ठाकूर, कामगार आघाडी अध्यक्ष अशोक दाभाडे, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अंशू पाठक यांनी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष रविंद्र माने यांनी केले.सूत्रसंचालन सरचिटणीस प्रमोद देशक,विनायक भेगडे यांनी आणि सरचिटणीस शोभाताई परदेशी यांनी आभार (Talegaon Dabhade) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.