Chikhali : चिखली येथे किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार; दोघे जखमी

एमपीसी न्यूज – चिखली परिसरात वैयक्तिक वादातून गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झाला. तर आरोपीच्या मित्राला देखील गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 12) रोजी सायंकाळी(Chikhali) घडली. 

अजय सुनील फुले (वय 19, रा. मोहननगर) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षल सोनावणे (रा. जाधववाडी, चिखली), श्याम चौधरी, कीर्ती भिऊलाल लिलारे अशी आरोपींची नावे आहेत. कीर्ती लिलारे हा गंभीर जखमी झाला आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा गॅस रिफिलिंगचे काम करतो. अजय आणि आरोपी यांच्यात मागील पाच ते सहा महिन्यांपासून वाद सुरू होते. अजय त्याच्या दुकानात असताना आरोपी हर्षल आणि त्याचे साथीदारआज सायंकाळी अजय फुले यांच्या दुकानात आले. त्यातील हर्षल याने अजयवर गोळीबार केला असता त्यात अजय जखमी(Chikhali) झाला.

या गोळीबाराच्या घटनेत हर्षल याने झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी त्याचाच साथीदार कीर्ती लिलारे याला लागली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आरोपी व जखमी यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून ही घटना वैयक्तिक वादातून झाली असल्याने या घटनेचा निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचे उपआयुक्त डॉ. पवार यांनी सांगितले.

मुख्य आरोपी हर्षल सोनावणे याला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले असून गोळीबारात जखमी झालेला आरोपी कीर्ती लीलारे याला रुग्णालयात दाखल केले आहे.   तर तिसऱ्या आरोपीचा गुन्हे शाखा युनिट एकने अटक केले असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले.

Bhosari : पोलिसात तक्रार दिल्यास खून करण्याची धमकी देत तरुणाला मारहाण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.