Chikhali : ज्योतिबाच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि हार चोरीला

एमपीसी न्यूज – मंदिराच्या लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आतील चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना तळवडे येथील ज्योतिबा मंदिरामध्ये मंगळवारी (दि. 29) पहाटे एक ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

नवनाथ रामचंद्र भालेकर (वय 39, रा. ज्योतिबानगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिबा मंदिर कुलूप लावून बंद असताना मंगळवारी पहाटे चोरट्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मूर्तीवर असलेला 750 ग्रॅमचा चांदीचा हार आणि मुकुट असा एकूण 25 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संदीप बागुल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.