Pune : ‘स्कुल ऑफ आर्ट’ च्या ‘आर्ट वॉक’​ला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’​च्या ​’स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट ​ ​अकेडमी ​​’​आयोजित आर्ट वॉक आणि आर्ट एक्झिबिशन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. 26 आणि 27 जानेवारी रोजी हे प्रदर्शन आझम कॅम्पस येथे भरले होते.

​​​​​स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट ​​अकॅडेमीच्या अकराव्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन​ ​निवृत्त अति​रि​क्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते​ आणि निवृत्त मेजर जनरल ​पवार यांच्या उपस्थितीत ​झाले. ​​संस्थेचे अध्यक्ष ​डॉ पी ए इनामदार​, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम ​आदी मान्यवर उपस्थित होते .

युवा कलाकार ​गणेश कळसकर यांनी पोर्ट्रेट ​निर्मिती​चे प्रात्यक्षिक दाखवले. ​​​​या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती मांडल्या होत्या. स्कुल ऑफ आर्ट​च्या​​ ​संचालक ​हेमा जैन,​​​ ​स्कुल ऑफ आर्ट​ ​प्राचार्य​ भरत लोंढे यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.