Pune : ‘सायन्सीफाय 2020’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट’ च्या वतीने आयोजित ‘सायन्सीफाय’ 2020 या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण गरवारे बालभवनच्या सल्लागार डॉ. विदुला म्हैसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट’ चे संचालक डॉ. ऋषी आचार्य यांच्या हस्ते झाले. २८ शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला. आविष्कार इंडिया आणि मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आझम कॅम्पस येथे पार पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.