Dighi : च-होलीत भरदिवसा 65 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – ताजणेमळा च-होली येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 65 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना (दि. 24) दुपारी साडेचार ते साडेसहा या दोन तासात घडली.

दीपाली युवराज जोशी (वय 30, रा. शिवपुरम हौसिंग सोसायटी, ताजणे मळा, चऱ्होली) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 25) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेचार ते साडेसहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी दीपाली यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप, कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.