Hinjawadi : सोशल मीडियाद्वारे ओळख झालेल्या तरुणाने बनावट अकाउंटद्वारे केले तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल

एमपीसी न्यूज – इन्स्टाग्राम अॅपवर चॅटिंग करून तरुणीशी ओळख केली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर त्या तरूणीचे बनावट अकाऊंट तयार केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून तरूणीचे अश्लिल फोटो तयार करून व्हायरल केले. हा प्रकार 23 जानेवारी रोजी घडला.

याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत चंद्रशेखर मेश्राम (रा. श्रीनगर, गोंदिया, महाराष्ट्र) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेश्राम याने 23 जानेवारी रोजी पीडित तरुणीचे इन्स्टाग्राम या सोशल साइटवर बनावट अकाउंट तयार केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करत त्या तरुणीचे अश्लिल फोटो तयार केले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत तरुणीची बदनामी व विनयभंग करत तिला धमकावले. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हिंगोले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.