Strawberry Farming : चिंबळी मध्ये सेंद्रिय पध्दतीने स्ट्रॉबेरीची शेती

एमपीसी न्यूज : चिंबळी (ता. खेड)येथील प्रयोगशील शेतकरी सीमा चंद्रकांत जाधव यांनी आपल्या शेतीत सेंद्रिय स्ट्रॉबेरी पीक घेतले आहे.स्वीटसंशेशन ,विंटर डाऊन,नाभिला या नामांकित वाणांची 1 महिन्यांची रोपे महाबळेश्वर येथुन आणून त्यांनी आपल्या शेतातील  10 गुंठे क्षेत्रात 1फूट उंचीच्या गादीवाफा, 70 सेंटीमीटर रूंदीच्या गादी वाफ्यावर(बेड पध्दतीने) लागवड केली आहे.

त्यापैकी स्वीट संशेशन स्ट्रॉबेरी या जातीची फळे चवीने सुमधूर आहेत. तर विंटर डाउन व नाभिला या वाणांच्या जातीची फळे आंबट गोड आहेत.ऑक्टोबर महिन्यात स्वीट संशेशन व विंटर डाउन स्ट्रॉबेरी या वाणांची  लागवड केली असून त्यांना फळे आली आहेत. एक महिन्यांची रोपे आणून शेतामध्ये लागवड गेल्यानंतर त्यांना 45 दिवसात फळे लागतात. स्वीट संशेशन  या वाणांची  स्ट्रॉबेरी चवीला गोड असून मात्र या झाडाला (त्या दोन वाणां पेक्षा) उत्पन्न (फळे)कमी येते.मात्र या स्ट्रॉबेरीच्या गोड चवीमुळे ते अप्रूप वाटत ते लक्षवेधी ठरत आहे.

 

विंटर डाउन व नाभिला  स्ट्रॉबेरीची चव आंबड गोड असून उत्पन्न (फळे) जास्त येते.त्यांनी नाभिला या जातीची लागवड नोव्हेंबर मध्ये केली असून या झाडांना फुले आलेली आहेत.या झाडांना शेण खताचा,गांडूळ खताचा वापर केला जातो.सेंद्रीय शेती मुळे या स्ट्रॉबेरीला इतर स्ट्रॉबेरीं पेक्षा वरचढ भाव भेटतो.(Strawberry Farming) त्यांच्या या शेतातील स्ट्रॉबेरीला पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी ,ज्यूस बार इ.ठिकाणी मोठी मागणी आहे.फिनॉलेक्स ड्रीप कंपनीचे ऋषिकेश छाब्रिया हे त्यांच्या शेतीला भेट देऊन गेले.तिन्ही जातीच्या पिकांची पाहणी करून त्यांनी स्ट्रॉबेरी व्यवस्थापनाचे कौतुक केले.तसेच ऋषिकेश छाब्रिया सह महाराष्ट्र राज्य व्यस्थापक प्रशांत जाधव,आधिकारी ललित भंडारी,प्रकल्प व्यस्थापक सागर शिंदे,सहाय्यक व्यवस्थापक राहुल चव्हाण यांनी भेट दिली.

 

शेत मजुरांद्वारे गादीवाफे (बेड पद्धतीचे) तयार करून मल्चिंग पेपरचा वापर करत झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची सोय करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शेता मध्ये पाऊस पडून ती झाडे खराब होऊ नये यासाठी त्या पद्धतची बेड (उताराची) व्यवस्था करण्यात आली आहे.(Strawberry Farming) स्ट्रॉबेरीची चव महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी सारखीच लागते.या पिकाला थंड हवामान आवश्यक असते.40 डिग्री व त्या पुढे तपमान गेले की स्ट्रॉबेरीच्या झाडांना विविध रोग प्रादुर्भाव सुरू होतो.हे 6 महिने पीक चालते. थंड हवामान असेल तर अधिक महिने चालते.येथे एका तोडीस सध्या 20 कीलो उत्पन्न मिळून 600 की.रु.दर भेटत आहे.स्ट्रॉबेरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.कॅल्शियम व व्हिटॅमिन सी,पोटॅशियम, मॅग्नेशियम भरपूर असते असे यावेळी येथे सांगितले.

तसेच त्यांनी एक एकर क्षेत्रात संमिश्र पिके घेतली आहेत.या एक एकर क्षेत्रामध्ये सर्व पिकांना बोरवेलच्या पाण्याची सुविधा आहे.त्यांनी ठिंबक व तुषार सिंचनाद्वारे बोरवेलच्या 1 एच पी मोटार द्वारे येथील देशी जातीचे टॉमेटो, नेत्रा जातीच्या काकडी(चवीने कडसर नसलेली),कोबी, पपई,ज्वारी,वांगी इ.पीक झाडांना पाणी दिले आहे.पिकांचे उत्पन्न ही मोठ्या प्रमाणात भेटत आहे

.घरी गीर गाय आहे. तिच्या खाद्यासाठी ज्वारीची पीक केले आहे. गाईच्या गोमूत्र व शेणाचा खत म्हणून वापर केला जातो.सेंद्रिय खताचा वापर केल्याने त्यांच्या मालाला वरचढ भाव मिळतो.गेली काही वर्षे सतत संमिश्र पिके घेत आहेत. भाजीपाला फळे यांची उच्चभ्रू सोसायटी मध्ये विक्री केली जात आहे.संमिश्र पिकातून वार्षिक उत्पन्न 10 लाख  मिळत आहे.

बांधावरती चिकू,आंबा,पपई,शेवगा ,लिंबू इ. झाडे आहेत. त्या प्रयोगशील शेती करत असून त्यांना शासन व इतर संस्थेद्वारे वेळोवेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. (Strawberry Farming)त्यांच्या या प्रयोगशील शेतीला महाराष्ट्रच्या राजाच्या विविध भागातून तसेच इतर राज्यातून गोवा,गुजरात,राजस्थान,कर्नाटक ,हैद्राबाद इ.राज्यातील नागरिक मान्यवर भेट देऊन गेले आहेत.शेतीमधील सर्व कामे सीमा जाधव करतात.याबाबत सर्व माहिती चंद्रकांत जाधव यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.