Chinchwad : सकल जैन समाजाच्या वतीने अन्नदानाचे वाटप

एमपीसी न्यूज – राष्ट्रसंत प. पु. श्री चंद्रप्रभजी म.सा. एवं राष्ट्रसंत श्री ललितप्रभा जी म.सा. यांच्या प्रेरणेतून चिंचवडमधील जैन बांधवाच्या वतीने चिंचवड येथील चापेकर चौक येथे ‘महावीर की रोटी’ हा उपक्रम करण्यात आला. यावेळी रविवारी (दि. 8) सकाळी अन्नदानाचे वाटप चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमामध्ये पिंपरी-चिंचवडमधील जैन समाजाने योगदान दिले. उपक्रमाचे नियोजन मनीष सोनगिरा, हेमंत गुगले, राजेंद्र जैन, दिलीप नहार, सचिन धोका, प्रसन्ना चोपडा, प्रवीण सोनिगरा आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.