Pune : भावडी गावच्या जिल्हा परिषद शाळेला तीन संगणक भेट

एमपीसी न्यूज – वाघोली येथील रायसोनी शिक्षण संस्थेच्या जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अ‍ॅण्ड मॅनेजमेंन्टतर्फे दत्तक घेतलेल्या भावडी गावच्या जिल्हा परिषद शाळेला तीन संगणक भेट देण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एनएसएस) गावात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना राहुल तांबे भावडी गावचे सरपंच राहुल तांबे म्हणाले, " सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे शहरी मुलांबरोबरच ग्रामीण विद्यार्थ्यांनाही संगणकाचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. रायसोनी शिक्षण संस्थेच्या सहकार्यामुळे भावडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संगणक साक्षर होतील”

वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 30 वेगवेगळया प्रकारची शेकडो झाडे लावण्यात आली. याप्रसंगी काशिनाथ तांबे, गणेश तांबे, दयानंद पाटील, प्रवीण कांबळे, रामदास हडगर, ज्ञानेश्वर गव्हाणे, सोमनाथ तांबे, शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा भोड, मंगेश चव्हाण, महेंद्र तांबे, उत्तम हडगर, श्रीमती जयश्री कर्डीले यांच्यासह भावडी ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.

संगणक दिल्याबद्दल रायसोनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील रायसोनी, विश्वस्त संचालक अजित टाटीया, नागपूर केंद्राच्या संचालिका डॉ. प्रीती बजाज व प्रभारी संचालक डॉ. वैभव हेंद्रे यांचे राहुल तांबे यांनी आभार मानले. तसेच विद्यार्थी याचा उपयोग जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करतील, असे त्यांनी सांगितले. शाळेत संगणक आल्यामुळे विद्यार्थ्यांत उत्साह व आनंद दिसत होता. कार्यक्रमाचे संयोजन विदयार्थी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सूर्यवंशी व एनएसएस कार्यक्रम अधिकारी रमेश पाटोळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.