Chinchwad : महाआरोग्य शिबिराचा 160 जणांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – भाजपा युवा मोर्चा, कर्तव्य फाउंडेशन आणि चैतन्य मेडिको यांच्या पुढाकाराने आणि स्टार हॉस्पिटल आकुर्डी यांच्या सहयोगाने, ईशान हॉस्पिटल, चिंचवड येथे नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा 160 नागरिकांनी लाभ घेतला.

महाराष्ट्र राज्य लेखा समितीच्या सदस्य अॅड. सचिन पटवर्धन यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवी लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष संतोष खिंवसरा, महावितरण समिती सदस्य भारती विनोदे, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, देविदास पाटील, बिभीषण चौधरी, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष,राजेंद्र चिंचवडे ,भाजपा शहर पदाधिकारी पाटीलबुवा चिंचवडे, कांता मोंढे, संजीवनी पांडे, रवींद्र देशपांडे, नंदू भोगले,राज दरेकर,सिद्धू लोणी,सुनील कुलकर्णी, अजय भोसले, सत्पाल गोयल, प्रवीण मुथा, सुजित आरुडे आदी उपस्थित होते.

यामध्ये हृदय, किडनी, मेंदू, मणका, अस्थीरोग, पोटाचे विकार, डोळे, महिलांचे अंतर्गत विकार, कर्करोग, किमोथेरोपी, मधुमेह (शुगर), बीपी, छाती, आदी आजारांवर तज्ञ डॉकटरांनी समुपदेशन केले. तसेच मोफत तपासण्या व औषधे देण्यात आली.

महाराष्ट्र विद्युत वितरण समिती सदस्य मधुकर बच्चे सांस्कृतिक आघाडी शहराध्यक्ष धनंजय शाळीग्राम, भाजयुमो शहर सरचिटणीस अजित कुलथे, पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

भाजयुमो प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे, सौरभ कर्णावट, गिरीश हंपे, सज्जाद शेख, राजु कोरे, अमर जाधव, अक्षय कुलथे, अमोल शहाणे, प्रसाद देवळालीकर, प्रभाग महिला अध्यक्ष रोहिणी बच्चे, सुषमा कोरे, वर्षा शेंबेकर, राजश्री जाधव, माधवी इनामदार, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.