Chinchwad : चक्क पिंपरी चिंचवडच्या फौजदाराने जिंकले ड्रीम 11 वर दीड कोटी रुपये

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एक पोलीस फौजदार चक्क एका दिवसात करोडपती झाला (Chinchwad) आहे. ड्रीम 11 मध्ये क्रिकेटच्या सामन्यावर टीम लाऊन फौजदाराने तब्बल दीड कोटी रुपये जिंकले आहेत.

पोलीस फौजदार सोमनाथ झेंडे असे एका दिवसात करोडपती झालेल्या नशीबवान अधिकाऱ्याचे नाव आहे.

सोमनाथ झेंडे हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयातील आरसीपी मध्ये नेमणुकीस आहेत. त्यांना क्रिकेटची आवड असल्याने ते सध्या सुरू असलेल्या क्रिकेटच्या सामन्यांवर ड्रीम 11 या ऑनलाइन खेळामध्ये आपली टीम लावून सहभागी होत असत.

India : मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय; गौतम अदानीची दुसऱ्या स्थानावर घसरण

दरम्यान मंगळवारी (दि. 10) झेंडे यांनी ड्रीम 11 या खेळामध्ये बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यात सहभाग घेतला. (Chinchwad) त्यामध्ये त्यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. बक्षिसाची रक्कम एक कोटी 50 लाख एवढी आहे. एका दिवसात झेंडे यांचे नशीब पालटले असून ते करोडपती झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.