Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे यांची चिंचवडमध्ये पदयात्रा, मतदारांशी साधला संवाद

 एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी चिंचवड परिसरात पदयात्रा काढली. (Chinchwad Bye-Election) श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून ते संपूर्ण चिंचवडगाव परिसरात पदयात्रा काढण्यात आली.

राहुल कलाटे शिट्टी या चिन्हावर पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत. पदयात्रेची सुरवात कलाटे यांनी मोरया गोसावी यांच्या समाधीच्या दर्शनाने केली.

Alandi News : तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन

त्यानंतर क्रांतिवीर चापेकर चौक, गांधी पेठ, गावडे भोई आळी, चिंचवडगाव बस थांबा, लिंक रस्ता, तानाजी नगर, काकडे पार्क, शनि मंदिर, राज पार्क, केशव नगर, निंबाळकर आळी (Chinchwad Bye-Election) या मार्गाने जात नंतर हनुमान चावडी मंदिराच्या जवळ पदयात्रेची सांगता झाली. या संपूर्ण पदयात्रेत कलाटे यांनी नागरिकांसह व्यापारी वर्गाशी संवाद साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.