Chinchwad Bye-Election : निवडणूक शहराच्या राजकारणाची दिशा बदलणारी – राहुल कलाटे  

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे. शहराच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक असल्याचे (Chinchwad Bye-Election) अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी म्हटले आहे. चिंचवडच्या विकासासाठी कामे केली आहेत. विविध प्रश्नांवर आंदोलने  केली आहे. त्याच बळावर निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नागरिकांशी संवाद साधताना राहुल कलाटे म्हणाले, वाकड परिसरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तानाजी तुकाराम कलाटे उद्यान, ऑक्सिजन पार्क ,मुंबई बेंगलोर हायवे ते ताथवडे गावठाण डीपी रोड, पुनावळे वॉटर टँक, वाकड उद्यान व जॉगिंग ट्रॅक ,वाकड उद्यान सुशोभीकरण ,भगवान नगर नवीन पाण्याची टाकी, वाकड दशक्रिया घाट इत्यादी कामे केली.

Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे यांची चिंचवडमध्ये पदयात्रा, मतदारांशी साधला संवाद

विकास कामे करत असताना त्यात अडथळे आणण्याचे (Chinchwad Bye-Election) उद्योग काही मंडळींनी केले. पण, त्यावर मात करत कामे केली.  पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यात  इथल्या नेतृत्वाला अपयश आले आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.