Chinchwad : क्षमता 39 अन प्रवासी भरले 80; आरटीओ कडून कठोर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन ( Chinchwad) विभागाच्या (आरटीओ) बुधवारी (दि. 18) वायुवेग पथकाने एका बसवर (युपी 31/टी 9217) कठोर कारवाई केली आहे. बसची प्रवासी क्षमता 39 एवढी असताना चालकाने बसमध्ये तब्बल 80 प्रवासी बसवले. याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

या बसची आसन क्षमता 24 सिट्स आणि 15 बर्थ अशी एकूण 39 प्रवासी एवढी होती. असे असताना चालकाने बसमध्ये 80 प्रवासी बसवले. या बसची तपासणी केली असता त्यामध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्रणा तसेच आपत्कालीन द्वार नसल्याचे आढळून आले. बसच्या खिडकीचे काच तुटलेले होते. तसेच रिफ्लेक्टर, टेल लॅम्प कार्यान्वीत नव्हते.

बसच्या टपावरुन मालाची वाहतूक केली जात होती.  बस पाच टन ओव्हरलोड असल्याचे तपासणीमध्ये ( Chinchwad) आढळून आले. त्यामुळे ही बस प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे अटकावून ठेवण्यात आले आहे.

चालकाची अनुज्ञप्ती निलंबीत करणे, वाहनाची नोंदणी निलंबित करणे, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करणे व वाहनाचा परवाना (परमीट) निलंबित करणे याबाबतची कार्यवाही आरटीओकडून सुरु करण्यात आली आहे.

Mp Shrirang Barne : रस्ते, गृहनिर्माण संस्थांच्या पायाभूत सुविधांबाबत उद्या महापालिकेत बैठक

एखाद्या वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्यास [email protected] यावर तक्रार करावी. तसेच अशा वाहनातून प्रवास करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने टाळावे, असे आवाहन आरटीओ कडून करण्यात आले आहे.

ही कारवाई वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक प्रकाश मुळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक रविंद्र गावडे, गितांजली काळे यांनी केली. चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एकूण 2 हजार 622 बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 1 हजार 3 वाहने दोषी आढळून आली असून एकूण 1 कोटी 8 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात ( Chinchwad) आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.