Chinchwad : शहर पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन; गुन्हेगारांची धरपकड

एमपीसी न्यूज – लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, पुणे मेट्रो लोकार्पण, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, प्रधानमंत्री (Chinchwad ) आवास योजनेतील घरांचे लोकार्पण आणि नवीन घरांचे भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. 1) पुणे शहरात आले. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 31) रात्री कोंबींग ऑपरेशन आणि नाकाबंदी करून गुन्हेगारांची धरपकड केली. तसेच मंगळवारी 38 आंदोलनकर्त्यांनाही दिवसभर ताब्यात घेण्यात आले होते.
पंतप्रधान मोदी शहरात येणार असल्याने पुणे पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी देखील खबरदारीचे उपाय म्हणून गुन्हेगारांच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवला होता. शहरातील सर्व लॉजेस चेक करण्यात आले. लॉजमध्ये कोण, कधी आणि कशासाठी थांबले आहे, याबाबत चौकशी करण्यात आली.
मध्यरात्री अचानक नाकाबंदी लावून संशयित वाहनांची तपासणी केली. पंतप्रधान मोदींच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांच्या 38 पदाधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी लवकरच ताब्यात घेण्यात आले. पंतप्रधानांचा ताफा शहरातून बाहेर पडल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांची ठाण्यातून सुटका करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवड शहरात ऑल आउट मिशन, कोंबींग ऑपरेशन आणि अचानक नाकाबंदी लावण्यात आली. यासाठी एक अप्पर पोलीस आयुक्त, तीन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी रस्त्यावर होते. याव्यतिरिक्त 89 वरिष्ठ अधिकारी, 432 अंमलदार आणि 44 होमगार्ड, असा मोठा फौजफाटा तैनात (Chinchwad ) करण्यात आला होता.

पिंपरी – चिंचवड पोलिसांनी केलेली तपासणी
रेकॉर्डवरील आरोपी – 543
सराईत गुन्हेगार- 71
पाहिजे आरोपी – 53
फरारी आरोपी – 05
सांशीयत वाहने – 1912
लॉजेस – 166
संशयित व्यक्ती – 140

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.