Dehuroad : मणिपूर अत्याचार प्रकरणाचा काँग्रेसकडून निषेध

एमपीसी न्यूज – मणिपूर येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा ( Dehuroad ) युवक काँग्रेस देहूरोड शहर यांच्याकडून निषेध करण्यात आला. सोमवारी (दि. 31) मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला.

पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले प्रांतिक सदस्य दीपक सायसर, अल्पसंख्याक अध्यक्ष मावळ तालुका गफूरभाई शेख, मावळ तालुका युवक सरचिटणीस नेणार हरपुडे, विनोद पवार, मावळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष पवन गायकवाड, महिला अध्यक्ष प्रतिमा हिरे, सचिन हिरे, रईस शेख तालुका उपाध्यक्ष,असिफ सय्यद उपाध्यक्ष निलेश बोडके, उपाध्यक्ष राजू ठोकळे आदी उपस्थित होते.

Chinchwad : शहर पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन; गुन्हेगारांची धरपकड

 दि 31 जुलै रोजी युवक काँग्रेस देहूरोड शहर अध्यक्ष मलिक शेख व हाजीमलंग मारीमुत्तू ब्लॉक अध्यक्ष देहूरोड शहर व मावळ तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले यांच्या अध्यक्षतेखाली व रामदास काकडे व यशवंत मोहोळ, पै चंद्रकांत सातकर, यांच्या मागर्दशनाने युवक काँग्रेसच्या वतीने मणिपूर येथील महिला अत्याचार विरोधात आंदोलन करण्यात आले.

मोर्चाची सुरुवात सुभाष चौक देहूरोड या ठिकाणापासून झाली.नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिल्हाध्यक्ष महेश टापरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 त्यावेळी  पुणे जिल्हा युवक अध्यक्ष महेश टापरे यांनी सरकारला धारेवर धरत संबोधन केले . महिला अध्यक्ष यांनी महिलांच्या अत्याचार जाहीर ( Dehuroad ) निषेध नोंदवला. रोहन राऊत युवक मावळ तालुका सरचिटणीस यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.