Chinchwad : चिंचवडमध्ये विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

एमपीसी न्यूज – चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ एका विहिरीमध्ये कुजलेल्या अवस्थेत (Chinchwad) पुरुषाचा मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी (दि. 12) सायंकाळी उघडकीस आली.

Maharashtra : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षापासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू होणार – चंद्रकांत पाटील

याबाबत माहिती अशी की, चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ मोकळ्या जागेमध्ये विहीर आहे. या विहिरीमध्ये शनिवारी सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. त्यानंतर आत्महत्या की हत्या हे गूढ उलगडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अद्याप मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. चिंचवड पोलीस तपास करीत (Chinchwad) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.