Chinchwad : शहर पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड (Chinchwad) शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी (दि. 4) रात्री उशिरा दिले.

Asia Cup 2023 : भारताने नेपाळवर अपेक्षित अन दमदार विजय मिळवत सुपर फोर मधे केला शानदार प्रवेश

युसीटीसी फोर्स वन मुंबई येथे पोलीस अधीक्षक असलेले संदीप डोईफोडे यांची पिंपरी चिंचवड शहरात पोलीस उपायुक्त पदावर नुकतीच बदली झाली. दरम्यान, शहर पोलीस दलात तिसरे परिमंडळ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पुढील काही दिवसात त्याबाबत गृह विभागाकडून आदेश पारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संदीप डोईफोडे यांच्याकडे नवीन होणाऱ्या परिमंडळ तीनची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे अपर पोलीस अधीक्षक असलेले शिवाजी पवार यांचीही पिंपरी चिंचवड शहरात बदली झाली आहे. वाहतूक शाखा, विशेष शाखा यासाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्तांची गरज होती. सोमवारी झालेल्या बदल्यांमध्ये उपायुक्त पवार यांच्याकडे विशेष शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.

मागील काही दिवसात नव्याने शहरात आलेल्या पोलीस निरीक्षकांची देखील पदस्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अजित लकडे (गुन्हे शाखा), दीपक शिंदे (गुन्हे शाखा), अशोक कदम (चाकण वरिष्ठ पोलीस निरीक्षक), संतोष कसबे (महाळुंगे -गुन्हे), युनूस मुलानी (चाकण – गुन्हे), शंकर बाबर (वाहतूक शाखा), वैभव शिंगारे (गुन्हे शाखा), मनोज खंडाळे (वाहतूक शाखा), शहाजी पवार (वाहतूक शाखा) यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.