Chakan : चाकण पंचक्रोशीत कडकडीत बंद

एमपीसी न्यूज – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या उपोषण कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी चाकण (Chakan) येथे सोमवारी (दि. ४) कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला व्यापार्‍यांनी १०० टक्के आपले व्यवसाय बंद ठेवून प्रतिसाद दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

Chinchwad : शहर पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

बंदच्या हाकेला चाकण शहर व लगतच्या औद्योगिक भागातील गावांतील सर्व दुकानदार व व्यवसायिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिल्याने १०० टक्के व्यवहार ठप्प झाले होते. परिणामी दिवसभर अनेक ठिकाणी रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत होता. चाकण शहरामध्ये एकही दुकान दिवसभर उघडले गेले नाही.

मेडीकल, दवाखाने, दुध डेअरी या मानवी जीवनाशी निगडीत असणार्‍या अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या होत्या. दोन दिवस आधीच बंदची माहिती दिल्यामुळे सोमवारी अनेक नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले.

संपूर्ण चाकण परिसरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या १३ पदाधिकार्यांना चाकण पोलिसांनी सकाळी नोटीसा बजावल्या होत्या. चाकण मधील शिवाजी विद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर, भगवान पोखरकर, व्यंकटेश सोरटे, अशोक मांडेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.