Chinchwad : आमदार अश्विनी जगताप यांना डावलले जातेय का? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले..

एमपीसी न्यूज – अश्विनी जगताप या चिंचवडच्या (Chinchwad)आमदार आहेत. त्यांना कोणी डावलू शकत नाही. डावलण्याचा प्रयत्नही कोणी करणार नाही. कारण लोकप्रतिनिधी आमच्या पक्षाचा संघटनेचा गाभा असल्याचे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पत्रकार परिषदेतील वादावर पडदा टाकला.

 

दोनदिवसांपूर्वी भाजपच्या पत्रकारपरिषदेनंतर (Chinchwad)आमदार अश्विनी जगताप आक्रमक झाल्या होत्या. मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे. माझ्या नादी लागू नका, मला हलक्यात घेऊ नका, प्रत्येकवेळी मला डावलले जाते. पाठीमागून वार करणे सोडा, पुढे येऊन वार करा असे आव्हान देत आमदार जगताप यांनी भाजप सरचिटणीस नामदेव ढाके यांना सर्वांसमोर खडसावले होते.

Chikhali : वॉचमनने घरातील महिलांना बांधले आणि टाकला 24 लाखांचा दरोडा

याबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पत्रकार परिषदेत जे झाले त्याची मी संपूर्ण माहिती घेतली आहे. त्याचा विपर्यास केला आहे. आमची संघटना कधीही लोकप्रतिनिधींना डावलत नाही. या बैठकीचा अश्विनी जगताप यांनी समारोप केला. त्या आमदार आहेत. त्यांना कोणी डावलू शकत नाही. डावलण्याचा प्रयत्नही कोणी करणार नाही. कारण लोकप्रतिनिधी आमच्या पक्षाचा संघटनेचा गाभा आहे. संघटन आणि सरकार दोन चाके आहेत. आमदार आणि तेथील संघटना दोन चाके आहेत. विपर्यास केला म्हणून असे वक्तव्य झाले. त्यामुळे कोणीही लोकप्रतिनिधींना डावलणार नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.