Chikhali : वॉचमनने घरातील महिलांना बांधले आणि टाकला 24 लाखांचा दरोडा

एमपीसी न्यूज – घराची रखवाली करता करता वॉचमनने (Chikhali) त्याच घरात दरोडा टाकण्याचा कट रचला. त्याने त्याची पत्नी आणि इतर साथीदारांना बोलावून घरातील माय लेकीला बांधून घातले. त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम असा 23 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली.

वॉचमन महेश सुनार, त्याची पत्नी लक्ष्मी, त्याचा भाऊ कालु, त्याची पत्नी व इतर दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : वर्धापनदिनानिमित्त महापालिका इमारतीवर विद्युत रोषणाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश सुनार ( Chikhali ) हा फिर्यादी यांच्याकडे वॉचमन म्हणून काम करीत होता. मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आरोपी महेश सुनार याने फिर्यादी व तिच्या आईला बहाणा करून खाली बोलविले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या आईचे हातपाय बेडशिट आणि ओढणीच्या सहाय्याने बांधून ठेवले.

“अगर मुंह से आवाज निकाला तो जान से मार दुंगा’ अशी आरोपींनी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी घरात जाऊन सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने, रोख रक्‍कम असा एकूण 23 लाख 60 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच जाताना पुरावा राहू नये यासाठी घरातील डीव्हीआर देखील जबरदस्तीने चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.