Chinchwad : चिंचवडमध्ये खासगी बस जळून खाक

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या बसला आग लागली. आगीमध्ये बस जळून खाक झाली. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री पावणेबाराच्या सुमारास चिंचवड स्टेशन ते चिंचवड गाव या मार्गावर लोकमान्य हॉस्पिटल जवळ घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील अर्जुन ट्रॅव्हल्सची बस (एम एच 48 / के 0657) चिंचवडमध्ये लोकमान्य हॉस्पिटल जवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. रात्री अचानक बसला आग लागली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभाग आणि प्राधिकरण अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र या घटनेत बस पूर्ण जळून खाक झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.