Pimpri : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शेखर ओव्हाळ युवा मंचाचे कार्यकर्ते कार्यकर्ते सरसावले

एमपीसी न्यूज – सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेखर ओव्हाळ युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले. या पूरग्रस्तांसाठी खाद्य पदार्थांचे जिन्नस, पाण्याच्या बॉट्लसह नऊ तरुणांची रेस्क्यू टीम नुकतीच सांगलीला रवाना झाली आहे.

सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून सध्या तेथील पुरग्रस्तांची परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक लोक बेघर झाले आहेत. खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शेखर ओव्हाळ यांनी पुढाकार घेतला आहे. युवा मंचच्या माध्यमातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम सांगलीच्या आष्टा या गावी रवाना झाली. त्यांच्यासमवेत खाद्यपदार्थांचे जिन्नस आणि पाण्याचे बॉटल्स पाठविण्यात आले आहेत. या पथकात धीरज शिंदे, सुशील मोगरे, सैफ सय्यद, योगेश गव्हाणे, राज पवार, प्रशांत जळकुटे, नंदू अहिरे, सिद्धाप्पा धोबी, शुभम जगदाळे यांचा समावेश आहे.

शेखर ओव्हाळ म्हणाले की, संकटकाळात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले पाहिजे. या विचारातूनच सांगली भागातील आष्टा या गावी काही तरुणांना पाठविले आहे. यापुढेही युवा मंचातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल. या मदतकार्यात ज्या तरुणांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी शेखर ओव्हाळ युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन ओव्हाळ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.