Pimpri : गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाजसेवेला प्राधान्य द्यावे- शेखर ओव्हाळ

एमपीसी न्यूज – गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सव काळातच नाही. तर, त्यानंतरही सामाजिक कार्य करण्यावर भर दिला पाहिजे. समाजातील वंचितांना, निराधारांना मदत केल्यास तीच गणेशाच्या चरणी मोठी सेवा ठरू शकते. सण-उत्सवाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी समाजसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी केले.

ओव्हाळ यांनी गणेशोत्सव काळात शहर परिसरातील विविध 250 गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाची आरती केली. तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

गणेशोत्सवानिमित्त अबालवृद्ध एकत्र येतात, विविध कलागुणांचे सादरीकरण करतात. यामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण होत असते. सामाजिक एकोपा जपणारा सण म्हणून गणेशोत्सव ओळखला जातो. या सणात आनंद लुटण्याबरोबरच गरजूंना मदतीचा हात दिल्यास सणाचा आनंद द्विगुणित होतो, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.