Chinchwad : काळेवाडी – चिंचवड जोडणा-या मदर टेरेसा उड्डाणपूलावरील पथदिवे बंद अवस्थेत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक (Chinchwad)सुकर करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. काळेवाडी ते चिंचवड थेट जाण्यासाठी मदर तेरेसा उड्डाणपूल उभारण्यात आले आहे. या उड्डाणपुलावर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते.

रात्रीच्या वेळी या उड्डाणपुलावरून प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते. कारण पुलावरील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत.

Scholarship News : राज्यातील 32 हजार शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांसाठी 50 कोटींची आवश्यकता

काळेवाडी ते चिंचवड लिंक रोड हा मार्ग बहुपदरी आहे. हा मार्ग थेट (Chinchwad)औद्योगिक परिसरात जात असल्याने या मार्गावरील मदर टेरेसा उड्डाणपुलावर दुचाकी वाहनांपासून पासून ते अवजड वाहनांसह इतर वाहनांची गर्दी असते. तसेच या मार्गावरून बीआरटी मार्गही जातो. पहाटे आणि रात्रीच्या वेळी जॉगिंग व शतपावले करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्यने या मार्गावर येतात. या पार्श्वभूमीवर मदर टेरेसा उड्डाणपुलावरील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या रस्त्यारून रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

या पुलावरील पथदिवे बंद असल्याने पुलावरून बाहेर निघण्याचे मार्ग कळण्यास अडथळा निर्माण होत आहे. रात्री अपरात्री अंधाराचा फायदा घेऊन काही मद्यपी या मार्गावरील पदपथांवर बसून दारू पिताना आढळतात. तथापि, पथदिवे बंद असल्याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाकडे कळविण्यात आले असून त्याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचेही नागरिकांनी सांगितले.

याबाबत महापालिकेचे विद्युत अभियंता श्री. गलबले यांच्याशी संपर्क केले असता, ते म्हणाले “ उड्डाणपुलावरील पथदिव्यांच्या स्थितीबाबत संबधित अधिका-यांद्वारे पाहणी करून, तातडीने पथदिवे पूर्ववत करण्यात येतील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.