Chinchwad : रोबोकप ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत एस बी पाटील स्कूल संघाला इनोव्हेटिव्ह रोबोटचे विशेष पारितोषिक 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत ( Chinchwad )येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये इंडियन रोबोकप ज्युनिअर फाउंडेशनच्या सहकार्याने ‘इंडियन रोबोकप ज्युनिअर चॅम्पियनशिप – 24’ दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी प्राचार्या डॉ.बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते. या स्पर्धेत देशभरातील अठरा शाळांमधील 50 संघांनी सहभाग घेतला होता.

Interim Budget 2024 LIVE : 10 वर्षात सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले – निर्मला सीतारामन

यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने इनोव्हेटिव्ह रोबोट डिझाईन प्रकारात विशेष पारितोषिक पटकावले. या संघात रूचिर भोळे, आरूष गर्ग, सुपरश्व बसग्वदार, श्रेयस मंदारे यांचा समावेश होता. परीक्षक म्हणून श्वेता इंगे, दिपाली ढोकणे, प्रवीण नागवकर, ज्ञानदा हिरे यांनी काम पाहिले.

अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ( Chinchwad ) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.