Chakan : खेड तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी गणेश फलके तर उपाध्यक्षपदी राजेंद्र मांजरे

एमपीसी न्यूज –  खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश फलके तर उपाध्यक्षपदी राजेंद्र मांजरे यांची निवड (Chakan) करण्यात आली आहे. तर पत्रकार परिषद प्रमुखपदी जेष्ठ पत्रकार तुकाराम बोंबले यांची एकमताने निवड करण्यात आली. खेड तालुका पत्रकार संस्था संचलित खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृह पार पडली . यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे –

अध्यक्ष गणेश फलके , उपाध्यक्ष राजेंद्र मांजरे , सचिव शरद भोसले , खजिनदार विजय मुऱ्हे , कार्याध्यक्ष चंद्रकात मांडेकर, सहखजिनदार तुषार मोढवे, सहकार्याध्यक्ष अशोक टिळेकर, सहसचिव रत्नेश शेवकरी, खेड तालुका पत्रकार परिषद प्रमुख तुकाराम बोंबले, सोशल मीडिया प्रमुख प्रफुल्ल टंकसाळे, सतीश आगळे, प्रसिद्धीप्रमुख आदेश टोपे यांची निवड करण्यात आली आहे.
पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार  म्हणून  ॲडव्होकेट निलेश कड पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर सल्लागारपदी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे ,राजेंद्र सांडभोर, एकनाथ सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, रुपेश बुट्टे पाटील ,नंदकुमार मांदळे, ए.पी शेख  या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असल्याचे पत्रकार संघाकडून सांगण्यात आले (Chakan) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.