Pune : पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलला उद्यापासून सुरुवात

एमपीसी न्यूज – दर वर्षीप्रमाणे भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी ( Pune ) आयोजीत पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचे आयोजन केले आहे. आत्ता पर्यंत झालेल्या तिन्ही प्रदर्शनाला पर्यटकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला तसा या चौथ्या प्रदर्शनाला ही मिळेल असे आयोजकाकडून सांगण्यात आले.

 

उद्या म्हणजेच 2 फेब्रुवारीला सकाळी 11  वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन डिपार्टमेंट ऑफ टुरिझमच्या डेप्यूटी डायरेक्टर  शमा पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नवचैतन्य हास्य क्लब चे   मकरंद टिल्लू, गिरीकंद ट्रॅव्हल चे संचालक   अखिलेश जोशी, जॉय अँड क्रू चे संचालक  अधिराज , थॉमस कुक चे श्रेयस कर्पे उपस्थित राहणार आहेत.

Chakan : खेड तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी गणेश फलके तर उपाध्यक्षपदी राजेंद्र मांजरे

 

तीन दिवसाच्या प्रदर्शना दरम्यान गिरिप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट मोहिमेच्या आठवणी चर्चासत्राच्या माध्यमातून मांडणार आहेत, तसेच अनेक पर्यंटन स्थळा विषयी तज्ज्ञ मंडळीकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

पीटीएफ ट्रॅव्हेल एक्झिबिशन मध्ये विविध देश विदेशातील सहलींचे पर्याय आणि आकर्षक लकी ड्रॉ देखील असणार आहेत, महाराष्ट्रातील नामांकित ट्रॅव्हेल कंपन्या त्यांचे विविध पर्याय या वेळी उपलब्ध करून देणार आहेत.

प्रदर्शनाचा पुणेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष  प्रवीण घोरपडे आणि सचिव  सुरेंद्र कुलकर्णी यांनी प्रसिद्धी( Pune ) पत्रकाच्या माध्यमातून केले आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.