PCMC : महापालिकेत 100 नवे कर्मचारी रुजू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील नव्याने नियुक्त केलेले ( PCMC ) कर्मचारी रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. 387 पैकी 100 कर्मचारी रुजू झाले आहेत. सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापूर्वी काही कर्मचा-यांना करसंकलन विभाग आणि अग्निशमन विभागाच्या सर्वेक्षणासाठी नेमले जाणार आहे.

महापालिकेच्या 15 विविध पदांसाठी एकूण 387 जागांसाठी मे 2023 ला राज्यभरात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी (पोलिस व्हेरिफिकेशन) आणि शारीरिक पात्रता तपासणी (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) घेण्यात आले आहे. उमेदवारांनी कागदपत्रे जमा केली आहेत. पात्र असलेल्या सर्व कर्मचा-यांना रुजू करून घेण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार 24 जानेवारीपासून कर्मचा-यांना रुजू करून घेण्यात येत आहे. मंगळवार (दि..30) अखेर 100 कर्मचा-यांना रुजू करून घेण्यात आले. त्यांना 5 फेब्रुवारीनंतर  प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Pune : पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलला उद्यापासून सुरुवात

काही कर्मचा-यांना करसंकलन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या मिळकतीच्या ड्रोन सर्वेक्षण आणि अग्निशमन विभागाकडून व्यापारी आस्थापनांचे फायर सर्टिफिकेट तपासणी केली जात आहे. त्या सर्वेक्षणास गती देण्यासाठी काही कर्मचारी तेथे नेमले जाणार आहेत. लिपिकांना पुण्यातील कोथरूड येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हन्मेंट (अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थापत्य विभागाचे 48 अभियंते, विद्युत विभागाचे 18 कनिष्ठ अभियंते, 74 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असे एकूण 140 कर्मचारी रुजू होणार आहेत. त्यांना महापालिका क्षमता निर्माण आणि संशोधनासाठी मुंबई येथील एमसीजीएम केंद्रात पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना विविध विभागात नेमले जाणार ( PCMC ) आहे.

नव्याने नियुक्त केलेले कर्मचारी रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. 100 कर्मचारी रुजू झाले आहेत. सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दैनंदिन कामकाज शिस्तबध्दपणे व मुदतीमध्ये करणे त्यांना सुलभ होईल. महापालिकेचे नियम, कामकाजाची संगणक प्रणाली, कामकाज कसे करावे. हे अवगत होणार आहे.

विठ्ठल जोशी,उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.