Pune : किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने वार, चार शाळकरी मुले ताब्यात

एमपीसी न्यूज –   एकमेकांना पहिले या किरकोळ कारणावरून (Pune)  पुण्यातील रामोशी गेट परिसरात शाळकरी मुलांनी एकावर चाकूने वार केले आहेत. गज, पट्ट्याने त्याला बेदम मारहाण केली. या घटनेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून आहे. ही घटना मंगळवारी (30 जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
याबाबत अल्पवयीन मुलाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडक पोलिसांनी चार शाळकरी मुलांना ताब्यात घेतले आहे.

 

PCMC : महापालिकेत 100 नवे कर्मचारी रुजू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार  अल्पवयीन मुलगा भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत दहावीत आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली चार अल्पवयीन मुले याच परिसरातील महापालिकेच्या उर्दू शाळेत दहावीत शिक्षण घेत आहेत. तक्रारदार अल्पवयीन मुलाची एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून एका मुलाशी दोन दिवसांपूर्वी भांडणे झाली होती.
फिर्यादी मुलगा रामोशी गेट परिसरातून निघाला होता. त्यावेळी चौघांनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ केली. व मुलावर चाकूने हल्ला चढविला. शाळकरी मुलाच्या छातीवर चाकूने वार केले. गज, साखळी, चामडी पट्ट्याने त्याला भररस्त्यात मारहाण केली. नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामोशी गेट पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. जखमी झालेल्या शाळकरी मुलावर ससून रूग्णालयात उपचार सुरू(Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.