Akurdi : आकुर्डीत वारकरी भवन उभारण्याची मागणी

एमपीसी न्यूज – आषाढीवारीला श्री संत तुकाराम महाराज पालखी ( Akurdi ) सोहळ्याचा पहिला मुक्काम विठ्ठलवाडी आकुर्डी येथे असतो. या पालखी सोहळ्यातील वारकरी, पदाधिकारी,विणेकरी, महाराज मंडळी तसेच महिला भगिणी यांना राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  वतीने या परिसरात प्रशस्त असे वारकरी भवन उभारण्याची मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाने केले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. देहु  संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी अध्यक्ष ह.भ.प. नितिन महाराज मोरे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशिद पाटील, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक आप्पासाहेब बागल, निगडी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष या तानाजी काळभोर उपस्थित होते.

Pune : किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने वार, चार शाळकरी मुले ताब्यात

निवेदनात म्हटले आहे की, श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे जाताना आकुर्डीत मुक्कामी असतो. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. पालखी परतीवेळी निगडी येथील श्री खंडोबा मंदिराच्या प्रांगणात विसाव्या साठी दोन ते तीन तास थांबत असते. या दिवशी पालखी सोहळ्या बरोबर 4 ते 5 हजार वारकरी असतात.

परिसरातील 5 ते 6 हजार भाविक भक्त पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे वारकरी भवन उभारण्यात यावे.  निगडी येथील श्री खंडोबाची यात्रा ज्या दिवशी असते अशा दोन्ही कार्यक्रमाच्या दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मंदीर परिसरात मंडप, कमान, स्टेज,स्पीकर्स इत्यादी व्यवस्था ( Akurdi ) करावी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.