Interim Budget 2024 LIVE : 7 लाख उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही; निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

एमपीसी न्यूज : आज अर्थमंत्री निर्मला सितारामन (Interim Budget 2024 LIVE) यांनी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेले बदल, योजना आणि त्यामुळे झालेल्या विकासाची माहिती दिली असून पुढे होणाऱ्या कामांचीही माहिती दिली. यामध्ये त्यांनी करदात्याना एक घोषणा करून दिलासा दिला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 7 लाख आहे त्यांना करामध्ये सूट देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवाय पुढे कर मर्यादा वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने नवीन कर प्रणालीसाठी कर मर्यादा वाढवून 7 लाख रुपये केली होती. यामुळे रिटर्न भरणाऱ्यांमध्ये 2.4 पट वाढ झाली आहे. कर परत करणाऱ्यांची संख्या वाढवणे हा त्यांचा उद्देश आहे. सध्या टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांना त्यांचे रिफंड लवकर मिळत आहेत.

Pune : किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने वार, चार शाळकरी मुले ताब्यात

तसेच टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये (Interim Budget 2024 LIVE) कोणताही बदल करण्यात आला नाही. आयात शुल्कातही कोणताही बदल झालेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.