Chinchwad : भांडणे सोडवायला आलेल्या सासऱ्यालाच जावयाने घेतला चावा  

एमपीसी न्यूज –  जुनी माणसे कायम म्हणतात (Chinchwad ) की नवरा-बायकोच्या भांडणात शहाण्याने पडू नये. मात्र पोटच्या मुलीला मारहाण होताना पाहून बापाला रहावले नाही म्हणून ते जावई अन मुलीच्या भांडणात पडले खरे. पण जावयाने सारा राग सासऱ्यावर काढला अन थेट त्यांच्या गालाचा अन पाठीचाच चावा घेतला. ही घटना चिंचवड येथे मंगळवारी घडली आहे.

Nitin Desai suicide : कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

याप्रकरणी सासऱे शिवाजी लक्ष्मण कुचेकर (वय 52 रा.चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून जावई आदेश प्रकाश कुचेकर (वय 25 रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मुलीच्या घरी मुक्कामी राहिले होते. रात्री झापले असताना जावई व मुलीमध्ये भांडण सुरु (Chinchwad ) झाले. या भांडणात जावयाने  मुलीला मारहाण कऱण्यास सुरुवात केली. मुलीला होणारी मारहाण थांबवण्यासाठी फिर्य़ादी भांडणे सोडविण्यासाठी गेले.

मात्र रागात असलेल्या जावयाने मध्यस्थी करणाऱ्या सासऱ्यावरच राग काढला अन त्यांच्या कानाला, गालावर व पाठीवर चावा घेतला व मारहाण केली. तसेच धमकी दिली. यावरून सासऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत (Chinchwad ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.