YCM : वायसीएममध्ये जनजागृती करत जागतिक स्तनपान जागृती सप्ताह साजरा

एमपीसी न्यूज – जागतिक स्तनपान जागृती सप्ताह हा जगभर एक ऑगस्ट ते 7 ऑगस्ट साजरा (YCM) केला जातो. यानिमित्त यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे मंगळवारी (दि.1) विविध कार्यक्रम घेण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखा इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स पुणे शाखा, लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयल, मेडीजैन ट्रस्ट व इनरव्हील क्लब, प्रितम मुलाचे हॉस्पिटल भोसरी या सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांद्वारे कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते.

Chinchwad : भांडणे सोडवायला आलेल्या सासऱ्यालाच जावयाने घेतला चावा  

या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेच्या वतीने नोडल ऑफिसर डॉ.वर्षा डांगे, वायसीएम हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.राजेंद्र वाबळे, वायसीएम हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी शैलजा भावसार,वायसीएम हॉस्पिटल मेडिकल कॉलेज बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ.अंबिके व प्रोफेसर डॉ. राजेश कुलकर्णी व डॉ.संध्या हरिभक्त, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने प्रेसिडेंट डॉ.सुशील मुथीयान,सेक्रेटरी डॉ. अनिरुद्ध टोणगावकर,

व्हाईस प्रेसिडेंट  डॉ.ललितकुमार धोका, इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या वतीने डॉ. स्वप्नाली धोका, डॉ तृप्ती शेट्टी तसेच लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्ष मधुरा (YCM) बुटाला, खजिनदार पटवर्धनव इतर लायन सदस्य आदी उपस्थित होते.

यावर्षीचा स्तनपान जागृती सप्ताहाचा विषय काम करणाऱ्या माता आणि कामाच्या जागेवर दूध पाजण्यासाठीची सोय, त्यांच्या सुट्ट्यांची गरज’ या विषयावर आधारित आहे. यावेळी जनजागृती म्हणून कार्यक्रमांमध्ये  ‘काम करणाऱ्या महिलेच्या स्तनपानविषयक समस्या ‘ या विषयावर  एक नाट्यछटा सादर करण्यात आली.

उपस्थित सर्व गरोदर व स्तनदामाता यांना प्रितम मेडिकल हॉस्पिटल, प्रीतम मेडिकल फाऊंडेशनच्यावतीने शपथ घेण्याचे कार्ड वाटप करण्यात आले. त्यानंतर त्या मातानी कार्डवर दिलेल्या मजकूराप्रमाणे शपथ घेतली.

उपस्थित महिलांना सर्व पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. आईचे दूध पाजल्याने बाळाला पोषणयुक्त आहार मिळतो.  पहिले सहा महिने (YCM) फक्त आईचेच दूध पाजल्याने  बाळाला जंतुसंसर्ग होत नाही. बाळाच्या पुढील आयुष्यातसुद्धा स्तनपान हे फायदेशीर असते.

आईच्या दुधाचे महत्त्व फक्त बाळासाठीच नाही तर मातेसाठी सुद्धा असते. दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त वेळ केलेल्या स्तनपानामुळे आईला स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी होते.आईचे वजन नियंत्रित होणे, प्रसूतीनंतरच्या रक्तस्राव कमी होणे  असे इतर फायदेही असतात.

Nitin Desai suicide : कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

या त्यामुळे आईचे स्तनपान बाळासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.स्तनपान सोडून इतर कोणतीही गोष्ट गाईचे दूध पावडरचे दूध मध किंवा गुटी या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळाला देऊ नयेत असेही सांगण्यात आले.

नाट्यछटीका सादर करण्यासाठी  कुटुंब नियोजन  विभागामधील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. सर्वात शेवटी स्तनपानाबद्दलची जागृती करणारी शपथ सर्व मातांना देण्यात (YCM) आली. सत्वयुक्त गुळ शेंगदाण्याच्या लाडूचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.