Sangavi : पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्य संवर्धनाचा ‘अटल संकल्प’; नवी सांगवी येथे तीन दिवस विनामूल्य शिबीर

एमपीसी न्यूज – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा वारसा (Sangvi)सक्षमपणे चालवत सर्वसामान्य नागरिकांना रोग निदान आणि उपचार अशी सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांनी या ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर’चे आयोजन केले आहे.

नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर 5 जानेवारी ते 7 जानेवारी असे तीन दिवस हे शिबीर होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल ट्रस्टसह विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांनी नियोजनात पुढाकार घेतला आहे.

स्व. लक्ष्मण जगताप यांनी 9 वर्षांपूर्वी अटल विनामूल्य आरोग्य शिबीर (Sangvi)आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. प्रतिवर्षी लाखो सर्वसामान्य कुटुंबातील गरजू नागरिक या शिबिराचा घेत आहेत. गतवर्षी 3 जानेवारी रोजी लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर’ चे आयोजन करण्यात आले.

Maharashtra : एलपीजीसह पेट्रोलजन्य पदार्थांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात – छगन भुजबळ

या शिबिरामध्ये ससून हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, वायसीएम, टाटा मेमोरीअल, मुंबई, कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटल, आदित्य बिर्ला, जहांगीर, दिनानाथ मंगेशकर, सह्याद्री, संचेती, पुना हॉस्पिटल, भारती, इन्लॅक्स बुधराणी इन्स्टिट्यूट, एच. व्ही. देसाई, व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य, चिंचवड, एम्स हॉस्पिटल, सिंम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, एमआयएमईआर मेडिकल कॉलेज, डॉ. बीएसटीआर हॉस्पिटल, श्रीमती काशीबाई नवले, इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल, रुबी अलकेअर, देवयानी, ओम, श्री हॉस्पिटल क्रिटीकेअर आणि तृमा सेंटर, कोहाकडे, सनराईज, आयुर्वेदिक न्युरो थेरपी, नारायण धाम, नॅशनल आयुष मिशन, स्टर्लिंग, ज्युपिटर, सूर्या मदत अँड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशी महाराष्ट्रातील नामांकीत रुग्णालये सहभागी होणार आहेत.

शिबिराचा लाभ घेण्यासाठी ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशनकार्ड) आणि पूर्वी काही आजार असल्याच त्याचे कागदपत्रे व मेडिकल रिपोर्ट सोबत आणावेत.

कॅन्सरसह विविध तपासण्या मोफत….

शिबिराच्या माध्यमातून कॅन्सर आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, एक्स रे, सोनोग्राफी, सर्व रक्त तपासण्या आणि डायलेसीसही मोफत करण्याची सुविधा आहे. यासह हृदयरोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण किडनी, विकास व प्रत्यारोपण, कॉकलर इन्प्लान्ट, लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्यांचे आजार, हिप प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, मोफत श्रवणयंत्रे, मेंदूची शस्त्रक्रिया, आयुर्वेद उपचार, मुत्र मार्गाचे विकार, त्वचा विकार, फाटलेली टाळू व ओठांवरील शस्त्रक्रिया, बॉडी चेकअप, एपिलीप्सी फिट येणे, कान-नाक-घसा, अनियमित रक्तदाब आणि शुगर तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, स्त्री रोग, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच सर्व आजारांवर आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया, मोफत अँन्जोग्राफी, अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे मोफत वाटप, मोफत चष्मे वाटप, आयुर्वेदिक, न्युरोथेरपी, आयुर्वेद, योगा, नॅकोपॅथी, उनानी सिद्धा होमिओपॅथी, कायरोपॅक्ट्रीक थेरपी अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

‘रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा…’ असा विचार आपल्या कृतीतून देणारे लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिराची सुरूवात केली. पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनही या शिबिरामध्ये गरजू नागरिक सहभागी होतात.

या शिबिरामध्ये अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा. दिव्यांग नागरिकांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांची सेवा घडावी..हाच आमचा संकल्प आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.