Maharashtra : एलपीजीसह पेट्रोलजन्य पदार्थांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज – राज्यातील वाहतूकदारांच्या संपामध्ये पेट्रोल, (Maharashtra)डिझेल व एल.पी.जी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

तसेच पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी.चा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना केल्या आहेत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत (Maharashtra)याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार एल.पी.जी., पेट्रोल व डिझेलचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये होतो.

Pimpri : महापालिकेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण

सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=9qHaE71Wgmc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.