Railway : डिसेंबर महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून एक कोटी 18 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पुणे विभागात डिसेंबर 2023 महिन्यात (Railway) विना तिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान बुक न करता तसेच घेउन जाणाऱ्यांकडून एक कोटी 56 कोटी रुपये वसूल करण्यात आले. त्यात फुकट्या प्रवाशांकडून एक कोटी 18 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे रेल्वे विभागात डिसेंबर 2023 मध्ये तिकीट तपासणीदरम्यान 16 हजार 22 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून एक कोटी 18 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच 6 हजार 308 प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी 37 लाख 35 हजार दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 199 प्रवाशांकडून 25 हजार 75 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली (Railway) तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.

Maharashtra : एलपीजीसह पेट्रोलजन्य पदार्थांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात – छगन भुजबळ

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

https://www.youtube.com/watch?v=9qHaE71Wgmc

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.