Railway News : कामशेत जवळील रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद

एमपीसी न्यूज – कामशेत-तळेगाव दरम्यानचे रेल्वे फाटक दुरुस्तीच्या(Railway News) कामासाठी शनिवार (दि. 6) आणि रविवार (दि. 7) रोजी बंद राहणार आहे. याबाबत पुणे रेल्वे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत-तळेगाव रेल्वे स्थानकां दरम्यान (Railway News)रेलवे किमी 148/5-6 वर असलेले रेल्वे फाटक संख्या 45 बंद राहणार आहे. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे फाटक बंद असेल. या कालावधीत जांभूळ गेट येथील रस्ता रहदारीसाठी वापरता येणार आहे.

 

Pimpri : शहरात गल्लोगल्ली भाजपाचे कमळ चिन्ह अद्यापही कायम; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेड

रेल्वे विभागाकडून शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक घेऊन देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. येत्या शनिवार आणि रविवारी आवश्यक दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने कामशेत जवळील रेल्वे फाटक बंद राहणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.