Pimpri : महापालिकेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण

एमपीसी न्यूज – जानेवारी रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (Pimpri )यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने “महिला शिक्षण दिन” साजरा करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांची भव्य रांगोळी रेखाटण्यात येत आहे.

यावेळी 10 ते 12 कलाकार यामध्ये सहभागी झाले. यावेळी रुढी परंपरा ना छेद देत ज्यांनी शिक्षणाची वाट सुकर करून दिली त्या सावित्रीबाईच्या शिक्षणाने यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या महिलांची देखील रांगोळी रेखा.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित विचार(Pimpri) प्रबोधन पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी उत्कृष्ट महिला बचत गटांचा सत्कार आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता “मी तुमची सावित्रीबाई फुले” हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग सुप्रसिद्ध कलाकार मेघना झुझम या सादर करणार आहेत.

Bhosari : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या चार तळीरामांवर गुन्हा दाखल

दुपारच्या सत्रात 12.30 वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित “सावित्रीच्या ज्योती” हा संगीत, नाट्य, नृत्य आणि गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुप्रसिद्ध कलाकार रितेश नगराळे सादर करणार आहेत. दुपारी 2.30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील विविध भागातील निमंत्रित कवी आपल्या कविता या कार्यक्रमात सादर करणार आहेत. तर सायंकाळी 5.00 वाजता “सावित्रीच्या लेकी” या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्या ऍड. मनिषा महाजन, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. मनिषा गवळी, प्रा. डॉ. माधवी खरात, पत्रकार अश्विनी सातव डोके तसेच सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7.00 वाजता निर्मिक आर्टस प्रस्तुत ‘’जागर समतेचा’’ या सांस्कृतिक प्रबोधनात्मक शाहिरी जलसेच्या कार्यक्रमाद्वारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे.

 

यामध्ये धम्मरक्षित रणदिवे आणि त्यांचे सहकारी सहभागी होणार आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

https://www.youtube.com/watch?v=9qHaE71Wgmc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.