Warje : वारजेत एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन – प्रदीप धुमाळ

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती साहित्यिक कट्टा वारजेतर्फे (Warje) एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (दि. 7 जानेवारी) सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत डॉ. मनिभाई देसाई सभागृह बायफ संस्था वारजे येथे हे संमेलन होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष प्रदीप धुमाळ आणि निमंत्रक, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी आज दिली.

रविवारी सकाळी 9 वा. ग्रंथदिंडी शुभारंभ ( राजयोग गणेश मंदिर ते बायफ संस्था) शिवचरित्रकार, ह. भ. प. धर्मराज महाराज हांडे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 वा. ग्रंथमहोत्सव उदघाटन श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10.30 वा. संमेलन उदघाटन समारंभ, पुस्तक वितरण व पुस्तक प्रकाशन संमेलनाध्याक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. न. म. जोशी, उदघाटक म्हणून राज्य शिक्षण आयुक्त सुरज मांढरे उपस्थित राहणार आहेत.
राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, बायफ संस्था अध्यक्ष भरत काकडे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.

Bhosari : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या चार तळीरामांवर गुन्हा दाखल

यावेळी अनिल हिंगे यांना उद्योगरत्न पुरस्कार, प्रा. एस. आर. पाटील यांना समाजरत्न पुरस्कार, निर्मला कैलास खिलारे यांना महिला साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 ते 1.30 वा. सुप्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेते अण्णा नाईक रात्रीस खेळ चाले फेम माधव अभयनकर यांची प्रकट मुलाखत म. सा. प. पुणे कार्यवाह वि. दा. पिंगळे घेणार आहेत. दुपारी 3 ते 5 वा. ‘समाजापुढील आजची आव्हाने आणि मार्ग’ हा परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी असतील.

तर, म. सा. प. पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, पोलीस अधिकारी सुषमा चव्हाण, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक श्रुती पानसे आपले विचार व्यक्त करणार आहेत. सायंकाळी 5 ते 7 वा. मान्यवरांचे कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी अंजली कुलकर्णी असतील. ज्योत्स्ना चांदगुडे, उध्दव कानडे, प्रभा सोनवणे, राजेंद्र शहा, निरुपमा महाजन, धनंजय तडवळकर, बंडा जोशी, अनिल दीक्षित, चिन्मयी चिटणीस, महेश कुलकर्णी, राजेंद्र वाघ, ज्योत्स्ना तानवडे, नंदकुमार बोधाई, अशोक शहा, बाबासाहेब जाधव, प्राजक्ता पटवर्धन, डॉ. प्रगती मोरे – मेंगडे आदी कवी सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन संदीप अवचट करणार आहेत. सायंकाळी 7 ते 9 वा. बहिणाबाईंच्या कविता संगीतमय कार्यक्रम होणार आहे.

केतन भाटे (संगीत), तृप्ती बाळ (संहिता लेखन), गायक सायली भाटे, चित्रा जोशी, चिन्मय दीक्षित, सायली वळसंगीकार व इतर सहभागी होणार आहेत. या संमेलनात जास्तीत जास्तीत जास्त साहित्य प्रेमींनी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन बाबा धुमाळ, दिपाली धुमाळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य, साहित्यिक कट्टा वारजे सचिव डी. के. जोशी, संयोजक ज्योत्स्ना चांदगुडे, गोपाळ कुलकर्णी, उदय कुलकर्णी, संगिता कुलकर्णी, महेश कुलकर्णी, शरद जतकर, नंदकुमार बोधाई, साधना कुलकर्णी, निवृत्ती येनपुरे, जयंत मोहिते, सुरेश जाधव, अशोक शहा, मानसी नलावडे, महादेव गायकवाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.