Bhosari : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या चार तळीरामांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसीमध्ये सार्वजनिक रस्त्यावर मद्य प्राशन (Bhosari) करून चार जणांनी गोंधळ घातला. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1) रात्री दीड वाजता करण्यात आली.

सुरेंद्र प्रसाद (वय 24, रा. भोसरी), मुरलीधर रेड्डी साथी (वय 30, रा. भोसरी), दत्तात्रय ज्ञानेश्वर भांदर्गे (वय 27, रा. चिखली), प्रकाश मनोहर करमळकर (वय 32, रा. दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रमोद फाळके यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : पुणे विद्यार्थी गृहाच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र बोऱ्हाडे यांची निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री आरोपींनी मद्य सेवन करून सार्वजनिक (Bhosari) ठिकाणी गोंधळ घातला. मोठमोठ्याने आरडओरडा केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या दरम्यान पोलिसांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर याबाबत कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.