Pune : पुणे विद्यार्थी गृहाच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र बोऱ्हाडे यांची निवड

एमपीसी न्यूज – शिक्षण व सामाजिक क्षेत्रात 114 वर्षांहून (Pune) अधिक काळ कार्यरत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र वि. बोऱ्हाडे यांची निवड झाली आहे, उपकार्याध्यक्षपदी एस. एम. जिर्गे, कार्यवाहपदी संजय नि. गुंजाळ, कोषाध्यक्षपदी कृष्णाजी मा. कुलकर्णी व कुलसचिवपदी दिनेश पि. मिसाळ यांची निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या कौन्सिल व संचालक मंडळाच्या सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची 2024 ते 2028 या कालावधीकरिता निवड करण्यात आली. हे सर्व पदाधिकारी संस्थेचे देणगीदार, माजी विद्यार्थी, सेवक व विद्यमान संचालक आहेत.

Chinchwad : शिवसेनेची लोकसभेची तयारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी किवळेत सभा

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी मावळते कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, संचालक मंडळातील रमेश कुलकर्णी, अमोल जोशी आदी उपस्थित होते.

प्रसंगी बोलताना राजेंद्र बोऱ्हाडे म्हणाले, “114 वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद वाटतो. ज्या संस्थेत शिकलो, त्याच संस्थेचा पदाधिकारी म्हणून काम करताना संस्थेची यशस्वी परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आहे. संस्थेच्या सहा शाखा असून, 65 शैक्षणिक व सामाजिक विभाग आहेत. सुमारे 30 हजार विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. यात आणखी भर घालून संस्थेचा (Pune) विस्तार व नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.