Chakan : संभाजी भिडें विरोधात जोडे मारो आंदोलन ; चाकणमध्ये कार्यकर्ते आक्रमक

एमपीसी न्यूज – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी (Chakan) महात्मा गांधी व महापुरुषांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याने चाकण परिसरात सर्वसामान्य जनतेतून संतापाची तीव्र भावना व्यक्त होत आहे. चाकण मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि. 1) भिडेंच्या फोटोला चपला मारण्यात आल्या.  भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

YCM : वायसीएममध्ये जनजागृती करत जागतिक स्तनपान जागृती सप्ताह साजरा

महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.   महात्मा गांधी व अन्य महापुरुष यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर, राष्ट्रवादी, काँग्रेस,शिवसेना ( ठाकरे ) पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने या विकृत व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी. संभाजी भिडेंवर कारवाई न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी दिला.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, तुकाराम कांडगे, मा. उपसरपंच अशोक बिरदवडे, मा. सरपंच दत्तात्रेय बिरदवडे, जमीर काझी, भास्कर तुळवे, राम गोरे,  वंदना सातपुते, मा. नगराध्यक्षा मंगल गोरे, नगरसेवक महेश शेवकरी, विशाल नायकवाडी,अ‍ॅड. निलेश कड, महेंद्र गोरे, मुबीन काझी, चंद्रकात गोरे,  स्वामी कानपिळे, शेखर पिंगळे, अशोक जाधव , संध्या जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने (Chakan) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.