Chinchwad : पार्ट टाईम जॉबच्या आमिषाने तरुणाची अडीच लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने (Chinchwad) तरुणाची तब्बल अडीच लाखाची फसवणूक केली आहे. ही घटना चिंचवड येथील तरुणासोबत 6 ते 7 सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी 30 वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून विविध बँकेचे खाते धारक व @Aimee445 , @financialanjana या टेलीग्राम धारकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी पार्ट टाईम जॉबचे आमीष दाखवले. यासाठी त्यांना 12 ते 15 टास्क देण्यात आले.

Chinchwad : रेल्वे रुळावर दगड ठेवल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यावेळी प्री डिपॉजीट ते ही व्याजासकट देण्याचे आमिष दाखवले. टास्कच्या (Chinchwad) विविध लिंक पाठवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांची 2 लाख 55 हजार रुपयांची फसणूक करण्यात आली आहे.

यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.