chikhali :भाड्याच्या घरात एक लाख रुपयाचा गुटखा साठवल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – भाड्याच्या घरात एक लाख रुपयांचा गुटखा (chikhali) साठवल्या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अमंलीपदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि.5) चिखली येथे करण्यात आली आहे.

 

निरज हरगोवींद कुशवाह (वय 25 रा. चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याला गुटखा पुरवणाऱ्या कानाराम (रा. कात्रज) याच्यावरही चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NCP : शरद पवार गटाच्या युवक आघाडीचा रविवारी शहरात महाराष्ट्राभिमान मेळावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या (chikhali )भाड्याच्या खोलीत विविध कंपनीचे प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला असा एकूण 1 लाख 14 हजार 221 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.