Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालय केंद्रावर 780 विद्यार्थ्यांनी दिली चित्रकला ग्रेड परीक्षा

एमपीसी न्यूज :आळंदी येथे महाराष्ट्र शासन यांच्या(Alandi) वतीने घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज केंद्रावर एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा यशस्वीरित्या संपन्न झाली.

या एलिमेंटरी चित्रकला परीक्षेसाठी 573 तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी 207 विद्यार्थी बसले होते. या केंद्रावर श्री ज्ञानेश्वर विद्यालय समवेत लक्ष्मीबाई दुराफे विद्यालय, भैरवनाथ विद्यालय कुरुळी, जि. प. शाळा मेदनकरवाडी, ज्ञानगंगा इंग्लिश मेडियम स्कूल, निकेतन, प्रा. डॉ. घारपुरे प्रशाला, मीनाबाई सोपानराव उपाध्ये इंग्लिश मेडियम स्कूल, ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूल, राजे शिवछत्रपती विद्यालय, आर. के. एल. गॅलक्सी इंग्लिश स्कूल इत्यादी शाळा सहभागी झाल्या होत्या.

Chinchwad : पार्ट टाईम जॉबच्या आमिषाने तरुणाची अडीच लाखाची फसवणूक

या परीक्षा केंद्रास संस्थेचे सचिव (Alandi)अजित वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे यांनी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक मुंगसे, उपमुख्यद्यापक सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे यांनी सहकार्य केले. केंद्रप्रमुख म्हणून दत्तात्रय वंजारी व उपकेंद्र प्रमुख म्हणून सोमनाथ बेळ्ळे यांनी कामकाज पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.