Dehuphata : चुरघळलेल्या नोटा सरळ करून देतो म्हणत महिलेची 19 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेत मशीनद्वारे रक्कम भरण्यासाठी(Dehuphata) गेलेल्या महिलेला चुरघळलेल्या नोटा सरळ करून देतो म्हणत हातचालाखीने 19 हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना देहुफाटा येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शुक्रवारी (दि.6) दुपारी घडली.

याप्रकरणी महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : पार्ट टाईम जॉबच्या आमिषाने तरुणाची अडीच लाखाची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बँकेत (Dehuphata)त्यांच्याकडील 48 हजार रुपयांची रोख रक्कम जमा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या मशीनद्वारे पैसे भरत आसताना आरोपी तेथे आला व त्याने फिर्यादीला चुरघळलेल्या नोटा मशीन घेत नाही असे सांगितले. तसेच फिर्यादी यांना मदतीचा बहाणा करत नोटा सरळ करुन देतो असे सांगितले.यावेळी हातचालाखीन आरोपीने फिर्यादी यांच्या रकमेतून 19 हजार रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.